South East Central Railway Apprentice Recruitment : नमस्कार मित्रांनो, दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे ने रायपूर विभाग व वॅगन रिपेरियर शॉप साठी अप्रेंटिस पदांसाठी 1003 जागेसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. यामध्ये कशाप्रकारे अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची तारीख सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे South East Central Railway Apprentice Recruitment
(नमस्कार मित्रांनो, कोणतीही नोकरीत अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा, भरती बाबत कोणतीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर मध्ये एकूण एक हजार तीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025 आहे तर 3 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
पदांचे तपशील :
- वेल्डर – 185
- फिटर – 199
- टर्नर -14
- Copa -10
- स्टेनोग्राफर – 21
- हेल्थ आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर -32
- डिझेल मेकॅनिक -34
- मशीनिस्ट -12
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 9
- इतर काही पदेही उपलब्ध आहेत
2) वॅगन रिपेअर शॉप, रायपूर
- फिटर – 110
- वेल्डर -110
- मशीनिस्ट -15
- इलेक्ट्रिशन – 14
- कॉपा -4
- स्टेनोग्राफर -2
शैक्षणिक पात्रता
या पद भरतीमध्ये उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे. तर किमान 50% गुण असणे आवश्यक आहे तरच यामध्ये पात्र ठरणार आहे.
वयोमर्यादा
या पद भरतीमध्ये उमेदवाराची वय किमान पंधरा वर्षे तर कमाल 24 वर्षे असणे आवश्यक आहे. तर SC/ST उमेदवारांना पाच वर्ष सवल देण्यात येणार आहे. तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे आणि दिव्यांग व माजी सैनिकांसाठी दहा वर्षे सवलत असणार आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये उमेदवारीची निवड 10वी आणि आयटीआय मधील गुणांच्या सरासरीवर आधारित मेरिट लिस्टने केली जाणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
अर्ज कसा करायचा
उमेदवाराला या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी अधिकृत वेबसाईट apprenticeshipindia.gov.in वर भेट द्या त्यानंतर रजिस्ट्रेशन करा प्रशिक्षण केल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि प्रिंट आऊट घेऊन ठेवा.
अर्ज करण्याच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख 3 मार्च 2025 आहे
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2025
अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
जाहिरात वाचण्यासाठी | इथे क्लिक करा |
5 thoughts on “दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू”
Comments are closed.