SBI CBO Bharti 2025: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच देशातील सर्वात मोठी आणि नावाजलेली बँक या बँकेला प्रतिष्ठित बँक असे देखील म्हटले जाते. या बँकेत अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुणांच्या डोळ्यात असते. त्या तरुणांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना मोठी संधी आता उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ने नुकतीच circle based officer (CBO) पदासाठी 2964 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर बनवायचे असेल तर ती तुमच्यासाठी गोल्डन संधी आहे. जर तुम्ही आधीपासून या क्षेत्रात अनुभव घेतला असेल तर ही भरती तुमचे भविष्य बदलू शकते. तर एसबीआय सीबीओ भरती 2025 जबरदस्त नोकरी करण्यासाठी संधी आहे. अनुभव कौशल्य आणि प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही एसबीआय सारख्या प्रतिष्ठित बँकेत अधिकारी बनू शकतात.
SBI बँकेत भरती
एकूण जागा | 2964 |
पदाचे नाव | सर्कल बेस्ड ऑफिसर |
नोकरीचे ठिकाण | उमेदवाराने अर्ज करताना निवडलेले सर्कल |
अर्ज करण्याची तारीख | 9 मे 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 मे 2025 |
ऑनलाइन परीक्षा | जुलै 2025 (संभाव्य) |
वयाची अट | 21 ते 30 वर्ष (30 एप्रिल 2025 रोजी) |
भरतीसाठीची पात्रता
या भरतीसाठी किमान दोन वर्षाचा बँकिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्या उमेदवारांना या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालेल.
महत्त्वाच्या लिंक्स
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
भरतीची निवड प्रक्रिया:
- ऑनलाइन परीक्षा: या परीक्षेमध्ये इंग्रजी बँक विज्ञान सामान्य ज्ञान अर्थव्यवस्था आणि संगणक चाचणी असे एकूण विभाग असतील.
- स्क्रीनिंग: तुमच्या कामाचा अनुभव एसबीआयच्या स्केल 1 ऑफिसर च्या कामाशी जुळतो का हे पाहिले जाईल.
- मुलाखत: या भरतीमध्ये 50 मार्कासाठी मुलाखत होईल. यामध्ये पात्रता गुण मिळवणे आवश्यक आहे.
- भाषा चाचणी: तुम्ही ज्या सर्कलमध्ये अर्ज केला आहे त्या भागातील स्थानिक भाषा वाचता लिहिता व समजता येणे आवश्यक आहे.
वेतन व फायदे
या भरती अंतर्गत नोकरी मिळवल्यानंतर सुरुवातीला पगार 48 हजार 480 रुपये पासून सुरुवात होईल. यामध्ये दोन वाढीव इन्क्रिमेंट मिळणार आहेत. याशिवाय डीए एचआरए मेडिकल एल एफ सी एन पी एस आणि इतर सर्व भत्ते मिळतील. SBI CBO Bharti 2025
हे पण वाचा|Mahavitran Admit Card: महावितरण विद्युत सहाय्यक भरतीचे हॉल तिकीट जाहीर; लगेच करा डाऊनलोड इथे
अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर current openings या टॅब मध्ये अर्ज करता येईल
- अर्ज करताना फोटो सही अंगठ्याचा ठसा आणि हॅन्ड रिटर्न डिक्लेरेशन अपलोड करणे आवश्यक आहे.
फीस:
- General OBC EWS उमेदवारांसाठी अर्ज फी 750 रुपये आहे.
- SC ST PWBD साठी फीस नाही.
नियम व अटी
- अर्ज करणारा उमेदवार एकाच सर्कलची निवड करू शकतो.
- निवड झाल्यावर बारा वर्षापर्यंत किंवा SMGS-4 ट्रेड पर्यंत इंटर सर्कल ट्रान्सफर मिळणार नाही.
- अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित आणि स्पष्ट अपलोड करणे आवश्यक आहे.