RRB ALP Bharti: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9970 जागांसाठी भरती

RRB ALP Bharti: भारतीय रेल्वेने 2025 मध्ये सहाय्यक लोको पायलट (ALP) पदासाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे रेल्वे मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी एकूण 9970 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे तुम्ही केंद्र शासनाच्या सेवेत रेल्वे सारख्या प्रतिष्ठित पदावर कार्य करू शकता. आपण या लेखांमध्ये या भरतीला अर्ज कसा करावा? या भरतीसाठी पात्रता काय? परीक्षा कशी होणार? आणि इतर माहिती मुद्देसुर पाहणार आहोत.

भरती बद्दल महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव: सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot-ALP)
  • पगार: सुरुवातीचा पगार 19 हजार 900 रुपये आहे.
  • एकूण जागा: 9970 जागा रिक्त
  • वय मर्यादा: 1 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष (आरक्षणा नुसार सवलत दिली जाते)

पात्रता

रेल्वे मधील ALP पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून किंवा बोर्डाकडून ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्या संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीला अर्ज करण्यासाठी शेवटची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे. शेवटच्या वर्षाच्या निकालाची वाट पाहत असलेले उमेदवार या भरतीला अर्ज करू शकणार नाही.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क

  • सामान्य उमेदवार: 500 रुपये (CBT-1 ला उपस्थित राहिल्यास 400 रुपये परत मिळतील)
  • SC/ST/EWS/EBC: 250 रुपये (CBT-1 ला उपस्थित राहिल्यास परतावा पूर्ण मिळेल)
  • महिला/मायनॉरिटी उमेदवार: 250 रुपये (CBT-1 ला उपस्थित राहिल्यास परतावा पूर्ण मिळेल)

अर्जाचा शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जात आहे. अर्ज भरताना बँकेचा तपशील भरणे आवश्यक आहे कारण तुमच्या शुल्क चा परतावा याच खात्यात जमा केला जाईल.

आरक्षण धोरण

SC/ST/OBC/EWS आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. OBC-NCL प्रवर्गातील उमेदवारांसाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दरम्यान आरक्षण धोरणा मधून लाभ घेणाऱ्या उमेदवारांची सर्व प्रमाणपत्रे अधिकृत रीत्या जारी केलेले असावेत. RRB ALP Bharti

रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्याची सुरुवात: 12 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025 (11:59 PM)
  • अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख: 13 मे 2025
  • अर्जाची सुधारणा करण्याची शेवटची तारीख: 14 मे ते 24 मे 2025

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संबंधित तारखेच्या कालावधीमध्ये अधिकृत रेल्वेच्या (RRB) वेबसाईटवर जाऊन create an account क्लिक करून या संबंधतील सर्व माहिती भरावी लागेल. यानंतर तुमचे खाते तयार होईल यामधील सर्व माहिती अचूक भरा कारण ती माहिती पुढे बदलता येणार नाही. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागणार आहे.

नोकरी संबंधातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

error: Content is protected !!