Punjab Bank Apprentice Recruitment 2025 | बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. नामांकित सरकारी बँक पंजाब आणि सिंध बँकेने 158 पदांसाठी अप्रेंटिस भरती जाहीर केलेली आहे. भरती अंतर्गत विविध प्रकारचे पदे भरली जाणार आहे. संपूर्ण भारतामध्ये हि भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भारतातील काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इतर अटी जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. Punjab Bank Apprentice Recruitment 2025
( नमस्कार मित्रांनो, कोणत्याही भरती बाबत अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक. जर कोणत्याही भरती बाबत फसवीगिरी झाल्यास, आम्ही जबाबदार राहणार नाही)
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करण्याची उत्तम संधी निर्माण करून देते. जर तुम्ही देखील पात्र असाल तर वेळ वाया न घालता अर्ज करा आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका!
भरतीचा तपशील
- संस्था: पंजाब आणि सिंध बँक
- पद : अप्रेंटिस
- एकूण पदसंख्या : 158 पदे भरली जाणार
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 मार्च 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मार्च 2025
रिक्त पदांचा तपशील ( राज्यानुसार )
- हरियाणा : 20
- उत्तर प्रदेश :20
- पश्चिम बंगाल : 20
- बिहार : 15
- मध्य प्रदेश : 14
- राजस्थान : 10
- ओडिसा : 10
- आसाम : 6
- अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर, या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन
पात्रता निकष :
शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराला कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित राज्यातील स्थानिक भाषा अवगत असणे व लिहिता आणि वाचता यायला हवी.
वयोमर्यादा : किमान वय 20 वर्षे ते कमाल वय 28 वर्षे राखीव प्रवर्गासाठी सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत मिळणार.
इतर अटी : उमेदवाराकडे एकही वर्षाचा अनुभव नसावा. पदवीधर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकत नाही. उमेदवाराने शिक्षण पूर्ण केल्यानंतर जास्तीत जास्त पाच वर्षे झालेली असावी.
निवड प्रक्रिया
- बारावी किंवा समतुल्य परीक्षेतील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे. राज्य, जिल्हा, आणि प्रवर्गश्रेणी यानुसार निवड केली जाणार आहे. एकाच गुणसंख्येच्या उमेदवारांमध्ये वय जास्त असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्याची प्रक्रिया :
- अर्ज करण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in, आणि nats.education.gov.in भेट द्या, तर अधिक माहितीसाठी punjabandsindbank.co.in
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- दहावी, बारावी आणि पदवीचे गुणपत्रक
- जात प्रमाणपत्र
- EWS साठी उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा
अर्ज शुल्क :
- SC/ST/ PwBD: ₹100+कर
- General/OBC/EWS : ₹200 +कर
हे पण वाचा | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू