Maha Transco Bharti 2025 : नोकरी शोधत असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही कंपनी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली एक महत्त्वाची कंपनी आहे. राज्यभरातील विद्युत प्रसारण व्यवस्थापनाचे नियोजन व देखभाल करण्याचे काम या कंपनीमार्फत केले जाते. Maha Transco Bharti 2025
MSETCL ही भारतातील सर्वात मोठी राज्य प्रसरण कंपनी आहे कंपनीच्या 51,518 किमी लांबच्या वीज वाहिन्या आणि 742 उच्च दाब उपकेंद्र आहेत. त्यामुळे राज्याच्या विद्युत वितरणात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या कंपनीत तुम्ही देखील नोकरी करण्याचा विचार करत असाल तर कशाप्रकारे अर्ज करू शकता व अर्ज करण्याची पद्धत रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख खालील प्रमाणे वाचा.
कार्यकारी अभियंता पदांसाठी मोठी संधी
MSETCL अंतर्गत कार्यकारी अभियंता या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या पदासाठी तुम्ही देखील अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
पदांचे तपशील:
- पदांचे नाव : कार्यकारी अभियंता
- एकूण पदसंख्या : 4 (VJA-1, OBC-1, SEBC-1,OPEN-1,)
- पगार : ₹97,220 -₹2,09,445 प्रति महिना
- एकूण अंदाजे मासिक वेतन : ₹1,98,574
शैक्षणिक पात्रता व अनुभव
या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्थापित्य अभियांत्रिक (Civil Engineer) मध्ये पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तर, वीज क्षेत्रासाठी संबंधित स्थापित्य कामांचा किमान नववर्षाचा अनुभव आवश्यक आहे. यातील किमान पाच वर्षाचा अनुभव अतिरिक्त कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि सवलत
या पद भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणे आवश्यक आहे. तर SEBC, OBC आणि इतर रखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा 45 वर्षे पर्यंत सिथिल आहे. महाराष्ट्र वीज प्रसारण कंपनी विद्यमान कर्मचारी असतील, तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष असणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
ऑनलाइन लेखी परीक्षा
- एकूण प्रश्न : 130
- एकूण गुण : 150
- वेळ : 120 मिनिटे
- विषय : स्थापत्य अभियांत्रिकी तांत्रिक ज्ञान (50 प्रश्न, 110 गुण)
- बुद्धि मापन चाचणी ( 40 प्रश्न, 20 गुण)
- संख्यात्मक अभियोग्यता : ( 20 प्रश्न, 10 गुण)
- मराठी भाषा ( 20 प्रश्न, 10 गुण)
- चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जाणार.
मुलाखत:
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीला बोलावले जाणार आहे. तर अंतिम निवडले की परीक्षा आणि मुलाखत यांच्या गुणावर होईल यासाठी लेखी परीक्षा 80 टक्के तर मुलाखत २० टक्के यांच्या गुणांच्या आधारे होईल.
नोकरीसाठी महत्त्वाचे कागदपत्रे
- अभियांत्रिक पदवीचे प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- एसएससी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- पासपोर्ट फोटो,
- जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
- मूळनिवास प्रमाणपत्र
- मराठी वाचन लेखन व संभाषण कौशल्याचे प्रमाणपत्र
फी आणि अर्ज प्रक्रिया
या पद भरतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ₹700/- आकारले जाणार तर OBC, SEBC, VJA प्रवर्गासाठी : ₹350/-
अर्जाची फी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड किंवा इतर ऑनलाइन पद्धतीने तुम्ही करू शकता.
परीक्षा केंद्र आणि परीक्षा पद्धती
परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे तर परीक्षेच्या तारखा आणि केंद्राची माहिती उमेदवारांना त्यांच्या मेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी कलर पासपोर्ट फोटो ओळखपत्र आणि कॉल लेटर सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल एके परीक्षा मे जून 2025 आहे तर मुलाखतीची तारीख लेखी परीक्षा नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
नोकरीची जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा |
तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.
2 thoughts on “Maha Transco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 504 जागांसाठी मोठी भरती; लगेच अर्ज करा”
Comments are closed.