Job Updates | नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक आणखी एक नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. हि नोकरी व्याघ्र प्रकल्प वन जीवन अंतर्गत राबविण्यात येत आहे. यासाठी तुम्ही कशा पकारे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. Job Updates (The recruitment process is a big recruitment process for job seekers because a big opportunity has been made available for them, so candidates who are really in need of a job They should apply for this recruitment as soon as possible)
(नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोणत्याही भरती बाबत अर्ज करताय तर संबंधित जाहिरात वाचून अर्ज करणे आवश्यक आहे जर भरती संदर्भात कुठलीही फसवीगिरी किंवा आर्थिक लबाडी झाली तर याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)
व्याघ्र प्रकल्प वन जीवन विभाग अंतर्गत सन 2024-25 करिता राज्य योजना निसर्ग संरक्षण व वन जीवन व्यवस्थापन अंतर्गत अकोट वन जीवन विभागात घुबड संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रस्ताव आहे. त्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
कामाचे स्वरूप : घुबड आणि अधिवास सर्वेक्षण करणे, माहिती संकलन रचना आणि विश्लेषण करणे, क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळांमध्ये मदत करणे, सदर कंत्राटी कर्मचारी हे, संशोधन पथक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांमधील सुरळीत संवादासाठी जबाबदार राहतील.
नोकरीचे ठिकाण : अकोट वनजीवन विभाग, अकोट
जर तुम्ही देखील या पद भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केलेला वयोडिटा व पदांकरिता आवश्यक असणारे कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यासाठी पीडीएफ फॉरमॅट चेक करा तर अर्ज करण्यासाठी def.akot@yahoo.com या ईमेल आयडी वरती मेल करा तसेच उपवनसरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन जीवन विभाग, अकोट यांचे कार्यालय सात-चार 2025 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोस्ट किंवा स्वतः मार्फत पोहोच करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: अर्ज उपवणसरक्षक, मेळघाट वेगळा प्रकल्प वन जीवन विभाग अकोट पोपटखेडा रोड अकोट जिल्हा अकोला पिन कोड 444101 या ठिकाणी दिलेल्या माहिती वरती पाठवायचा आहे संबंधित अर्ज व पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही जाहिरात वाचू शकता.
जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा
(अशाच नवीन व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भरतीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीची माहिती मिळेल.)
हे पण वाचा | Bank of Baroda Bharti 2025 : बँकेत नोकरी करण्याचे सुवर्णसंधी, 518 पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज