सरकारी नोकरी| भारतीय डाक विभागात मोठी भरती 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Indian Postal Department Recruitment | तुम्ही देखील चांगली पगाराची नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. ती म्हणजे भारतीय डाक विभाग अंतर्गत सांगली विभागात डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान नियोजन पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे या भरतीमध्ये तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता त्यासाठी खालील दिलेल्या लेख सविस्तरपणे वाचा.

( नमस्कार मित्रांनो कोणत्याही नोकरीत अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप गरजेचे आहे. भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)

भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती (Indian Postal Department Recruitment)

की भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अंतर्गत सांगली विभागात राबविण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान एजंट पदांसाठी ही भरती राबवण्यात येत आहे. भरतीची प्रक्रिया मुलाखतीद्वारे राबवण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2025 आहे. तर प्रवर अधीक्षक डाकघर अंतर्गत सांगली विभाग 416416 वेळ 11 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवार देखील अर्ज करू शकता.

वयोमर्यादा

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 10वी/12 वी/ पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असणे आवश्यक.
  • संगणकावर टाईप केलेले किंवा हस्तलिखित अर्ज द्या.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा अन्य अधिकृत ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो दोन
  • मागील कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करा.
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील

पगार व फायदे

भारतीय डाक विभाग अंतर्गत या पदासाठी कोणतीही निश्चित वेतन नाही, मात्र हे कमिशन आधारित काम असल्यामुळे तुमच्या कामाच्या गुणवत्तेनुसार उत्पन्न मिळणार आहे. PLI आणि RPLI विमा योजनेचे जास्तीत जास्त ग्राहक जोडल्यास तुम्हाला चांगले उत्पन्न मिळणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया नाही इच्छुक उमेदवार नात्यात मुलाखतीला उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ

  • प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली -416416
  • तारीख 22 मार्च 2024 वेळ सकाळी 11 वाजता
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा | India Post Office GDS Result 2025 : इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस निकाल लवकरच होणार जाहीर! अशा प्रकारे तपासा

error: Content is protected !!