Indian Air Force Agniveervayu Bharti: भारतीय हवाई दलाने अग्निवीर वायू भरतीसाठी 2025 मध्ये सुवर्णसंधी जाहीर केली आहे. भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करायचा विचार करत असाल तर लगेच या भरतीसाठी आपला अर्ज सादर करावा. देशभरातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील युवकांसाठी ही भरती आहे. ही संधी केवळ सैनिकी सेवेची नाही तर आपल्या हातून देशसेवा घडवावी यासाठी आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करावा? अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? वयाचे अट आणि शैक्षणिक पात्रता काय? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भरतीच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 21 एप्रिल 2025
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
- भरतीची तारीख: 10 जून 2025 ते 18 जून 2025
भरतीचे ठिकाण
भारतीय हवाई दल अग्निवीर पदासाठी संपूर्ण भारतामध्ये ही भरती दोन ठिकाणी होणार आहे. — 1) एअर फोर्स स्टेशन नवी दिल्ली 2) 7 ASC, क्यूब्बान रोड, बेंगळुरू. Indian Air Force Agniveervayu Bharti
वयाची पात्रता
1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान जन्म झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराचे वय 21 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वैवाहिक स्थिती
अर्ज करणारा उमेदवार विवाहित नसावा, कारण चार वर्षाच्या सेवा कालावधीत कोणीही विवाह करणार नाही याची हमी द्यावी लागेल. महिला उमेदवारांनी गर्भधारण न करण्याची हमी द्यावी लागेल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान 10 वी उत्तीर्ण असावा.
सेवा कालावधी व वेतन
अग्निवीर वायू म्हणून उमेदवाराची नेमणूक चार वर्षासाठी केली जाईल. या कालावधीत महिन्याला 30000 पासून सुरुवातीपासून वेतन मिळेल. त्यात दरवर्षी वाढ होईल. सेवा संपल्यानंतर सरकार आणि उमेदवाराच्या योगदानातून सुमारे दहा पॉईंट चार लाख रुपयांचे सेवानिधी पॅकेज दिले जाईल. सोबतच मोफत औषधोपचार कपडे निवास एलटीसी सुविधा आणि बँड प्रशिक्षण दिले जाईल.
अर्ज कसा करावा?
अग्निवीर वायू पदासाठी अर्ज करण्यासाठी वरी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता.
1 thought on “भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू..”
Comments are closed.