India Post Payment Bank bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. कोणत्याही परीक्षा शिवाय तुम्हाला आता डायरेक्ट बँकेत नोकरी मिळणार आहे. यासाठी कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, ही कोणती भरती आहे. अर्ज करण्याची पद्धत, भरतीचा तपशील सर्व गोष्टींची माहिती खालील प्रमाणे वाचा. India Post Payment Bank bharti 2025
(नमस्कार मित्रांनो, करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा. नोकरी बाबत कोणती फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही )
तुम्ही देखील बँकेत नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलेली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट (IPPB) बँकेमध्ये कार्यकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, कारण ही मेगा भरती असल्याने मोठ्या प्रमाणावरती उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे.
भरतीचा तपशील :
- भरती प्रक्रिया : ही भरती प्रक्रिया इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत राबवण्यात येत आहे.
- पद : कार्यकारी
- एकूण जागा : 51
- अर्जाची अंतिम तारीख : 21 मार्च 2025
- अर्ज करण्याची वेबसाईट : ippbonline.com
निवड प्रक्रिया :
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी मधून तर मुलाखती द्वारे केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा त्या राज्यातील स्थाय्य रहिवासी असल्यास प्रधान्य दिले जाईल. पात्रतेच्या निकषांचे पूर्तत्व केल्याने थेट मुलाखतीसाठी बोलावले जाईल असे नाही हे लक्षात घ्या.
कराराचा कालावधी:
उमेदवारांची सुरुवातीला एक वर्षासाठी करार नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर कामगिरी समाधानकारक राहिल्यास, दरवर्षी वाढ करून कमल तीन वर्षापर्यंत मुदत वाढ केली जाणार आहे.
वेतन आणि भत्ते:
त्या भरती प्रक्रियेमध्ये ₹30,000 मासिक वेतन भेटणार आहे, ज्यामध्ये कर कपात समाविष्ट असेल. भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार कर कपात लागू असेल.
अर्ज शुल्क :
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी : ₹150
- इतर सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना : ₹750 ( अर्ज शुल्क नॉन रिफनडबेल आहे)
असा अर्ज करा
- या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला Requirement 2025 या सेक्शन मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करा. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून ठेवा.
महत्त्वाची सूचना :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्ज मध चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केल्या जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित अर्ज करा.
जर तुम्हाला सरकारी बँकेत चांगल्या संधी सह स्थिर करिअर करायचे असेल तर भविष्यातील नोकरीचे उत्तम पर्याय व जाहिरातीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.
महावितरण मध्ये नोकरीची संधी जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा |
2 thoughts on “India Post Payment Bank bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोणत्याही परीक्षा शिवाय मिळणार नोकरी, पगार ₹30,000 लगेच अर्ज करा”
Comments are closed.