India Post Office GDS Result 2025 : इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस निकाल लवकरच होणार जाहीर! अशा प्रकारे तपासा

India Post Office GDS Result 2025 | इंडिया पोस्ट ऑफिस (GDS) जीडीएस साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच ग्रामीण डाक सेवक भरती 2025 चा निकाल लवकरच भारतीय पोस्ट ऑफिस कडून जाहीर केला जाणार आहे. यामध्ये कशा प्रकारे तुम्ही निकाल पाहू शकता चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. India Post Office GDS Result 2025

ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना गुणांचा यादी 2025 ची वाट पाहत आहात तर 2025 चा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करा.

ज्या उमेदवारांची निवड झाली आहे, त्यांचे नाव पीडीएफ यादीमध्ये असणार आहे. त्यामध्ये उमेदवारीचे नाव नोंदणी क्रमांक व इतर तपशील दिला जातो. यासाठी 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 पर्यंत उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते.

India Post GDS Result 2025 | इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) निकाल कसा तपासायचा?

  • निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचे सर्कल निवडायचे आहे.
  • आता तुमच्या स्क्रीन वरती निवड झालेली यादी ओपन होईल.
  • त्यानंतर तुमचे नाव त्या यादीमध्ये आहे का चेक करा तसेच ती पीडीएफ डाउनलोड करून घ्या.
  • भविष्यातील संदर्भ साठी त्याची प्रिंट आउट काढून घ्या.

या भरती प्रक्रिया अंतर्गत भारतीय पोस्ट ऑफिस भरतीसाठी एकूण 21,413 पदांची उमेदवारी नियुक्ती करणार आहे. उत्तर प्रदेश सर्कल साठी तीन हजार रिक्त जागा आहे. तर बिहारमध्ये 783 व छत्तीसगड मध्ये 638 आणि मध्य प्रदेश मध्ये 1314 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी उमेदवार फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यांची निवड उमेदवाराच्या गुणवत्तेवर आधारित असणार आहे. म्हणजे दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, पोस्टल सेवक ही पदी भरली जाणार आहेत.

लवकरच गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, उमेदवारांची पडताळणी लवकर पूर्ण होईल ज्यामध्ये उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल. भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली नव्हती, फक्त अर्ज मागविण्यात आलेले आहेत. आता अर्ज केल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

हे पण वाचा | India Post Payment Bank bharti 2025 | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये कोणत्याही परीक्षा शिवाय मिळणार नोकरी, पगार ₹30,000 लगेच अर्ज करा

error: Content is protected !!