IDBI Bank Bharti 2025: बँकेमध्ये नोकरी करण्याच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत जे बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडू इच्छित आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी बँकेत नोकरी करण्यासाठी संधी निर्माण झाली आहे. देशातील अतिशय मोठी आणि प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेली बँकेमध्ये IDBI बँकेने 2025 या शैक्षणिक वर्षासाठी PGBBF अभ्यासासाठी अर्ज मागवले आहेत. या अभ्यासाच्या यशस्वी पूर्णतेनंतर उमेदवारांना ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर म्हणून IDBI बँकेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. या भरतीद्वारे एकूण 650 पदे भरली जाणार आहेत.
निवड प्रक्रिया:
IDBI बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक वर्षाचा PGDBF अभ्यासक्रम राबवत आहेत. या अभ्यासक्रमामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
- 6 महिने वर्गखोल्यातील शिक्षण
- दोन महिने इंटर्नशिप
- चार महिने ऑन जॉब ट्रेनिंग
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना PGDBF देण्यात येते आणि त्यानंतर त्यांची IDBI बँकेमध्ये ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदावर नियुक्ती केली जाते.
पात्रता व निकष:
- शैक्षणिक पात्रता: भारतीय सरकार मान्यता विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर.
- वय मर्यादा: 01 मार्च 2025 रोजी किमान 20 वर्ष आणि कमाल 25 वर्ष.
- आरक्षण: SC, ST, OBC, EWS व PWD उमेदवारांना केंद्र सरकारच्या धोरणेनुसार सवलत.
हे पण वाचा| MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची मेगा भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची सविस्तर माहिती
निवड प्रक्रिया:
यामध्ये उमेदवाराची निवड दोन टप्प्यांमध्ये केली जाते.
- सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा (परीक्षाची संभाव्य तारीख-06 एप्रिल 2025)
- मुलाखत
ऑनलाइन परीक्षेमध्ये चार भाग आहेत.
- लॉजिकल रीझनिंग, डेटा अनलिसिस व इंटरप्रोटेशन – 60 प्रश्न
- इंग्रजी – 40 प्रश्न
- गणित व बुद्धिमत्ता – 40 प्रश्न
- सामान्य/आर्थिक/बँकिंग ज्ञान – 60 प्रश्न
प्रत्येक चुकीच्या उत्तरा साठी 0.25 गुण वजा केले जातील.
फीस:
- SC/ST/PWD उमेदवार:- 250 रुपये
- इतर सर्वसामान्य उमेदवार:- 1050 रुपये
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Join Total Naukri Channel | Telegram |
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज भरण्याची तारीख: 01 मार्च 2025
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025
- ऑनलाइन परीक्षा ची तारीख: 06 एप्रिल 2025 (संभाव्य तारीख)
अर्ज कसा करावा?
उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Requirement for IDBI PGDBF 2025-26 या लिंक वर क्लिक करून अर्ज करायचा आहे.
नोकरीचे वेतन:
नियुक्तीनंतर उमेदवाराचा एकूण वार्षिक CTC अंदाजे 6.14 लाख ते 6.50 लाख इतका असेल. पुढे योग्य कामगार नुसार प्रमोशनची संधी देखील मिळते. IDBI Bank Bharti 2025
प्रशिक्षण कालावधीतील मानधन:
- वर्ग शिक्षण (6 महिने): 5,000 रुपये प्रति महिना
- इंटर्नशिप (2 महिने): 15000 रुपये प्रति महिना
प्रशिक्षण यशस्वीरे त्या पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची बँकेत नियुक्ती केली जाते.