HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावीचा निकाल आज 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थी आणि पालक या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. पुणे नागपूर सोबत नऊ विभागीय मंडळाचे निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहेत. तुमचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या माहितीचा आधार घेऊ शकता. निकाल जाहीर होणार म्हटल्यावर निकाल कुठे पाहायचा? असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर बारावीचा निकाल पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही या ठिकाणावरून तुमचा बारावीचा निकाल जाणून घेऊ शकता.
गेल्या वर्षी बारावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली होती. गेल्या वर्षी 95.44% मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर मुलांचा निकाल 91.60% इतका लागला होता. यावर्षी कोणाचा निकाल जास्त लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बारावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर होणार असल्याने नागपूर विभागातून परीक्षा दिलेल्या एक लाख 58 हजार 537 विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता लागली आहे. यावर्षी परीक्षा लवकर झाल्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत किमान पंधरा दिवस आधी निकाल जाहीर होत आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येत आहे.
गेल्या वर्षी बारावीचा निकाल 93.37% लागला होता. 2024 च्या निकालामध्ये कोकण विभागाने मोठी बाजी मारली होती. कोकण विभागामध्ये 91.51% निकाल लागला होता. तर 91.95%सह मुंबई विभाग सर्वात शेवटी होता. यावर्षी निकाल कसा लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान निकाल कसा पाहावा? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. निकाल पाहण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेली माहिती फॉलो करू शकता. HSC Result 2025
निकाल कसा पाहावा?
- सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- होम पेजवर महाराष्ट्र एच एस सी निकाल 2025 ची लिंक दिली असेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर नवीन विंडो उघडेल, त्या ठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका.
- त्यानंतर खाली तुमच्या आईचे नाव टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स
आज दुपारी 1.00 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार निकाल कुठे पाहाल –
- http://hscresult.mkcl.org
- https://mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org
- https://results.navneet.com
- https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
- https://www.indiatoday.in/education-today/results
कोणत्या विभागाचा लागणार निकाल?
पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा एकूण विभागाचा निकाल मंडळ एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करणार आहे. राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यांचा आज दुपारी एक वाजता निकाल जाहीर होणार असून वरी दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. या निकालाची उत्सुकता राज्यातील 15 लाख विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता बारावी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात. यामध्ये प्रामुख्याने mahresult.nic.in या वेबसाईटचा वापर केला जातो.