Mahavitran Hall Ticket: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. विद्युत सहाय्यक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेचा पुढील टप्प्याबाबत आता महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्या उमेदवारांसाठी प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत.
परीक्षा | 20 ते 22 मे 2025 |
प्रसिद्धीपत्र | येथे क्लिक करा |
प्रवेशपत्र | येथे क्लिक करा |
हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी महावितरण च्या अधिकृत वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवारांना आपल्या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या साह्याने ते डाऊनलोड करता येतील. हॉल तिकीटवर तुमचे परीक्षा केंद्र, वेळ, तारीख आणि या सर्व महत्त्वाची माहिती स्पष्टपणे दिलेली आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि तारखेला परीक्षा केंद्रावर हजर राहून आपली परीक्षा द्यायची आहे. Mahavitran Hall Ticket
परीक्षा कधी होणार?
अधिकृत सूचनेनुसार लेखी परीक्षा लवकरच घेण्यात येणार असून त्याची तारीख आणि वेळ संबंधित उमेदवाराच्या प्रवेश पत्रावर दिली गेली आहे. ही परीक्षा 20 मे ते 22 मे 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रवेश पत्र काळजीपूर्वक वाचावे व त्यावर दिलेल्या सर्व सूचनेचे पालन करावे. ही भरती प्रक्रिया महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे उमेदवारांनी त्यांचे हॉल तिकीट वेळेत डाऊनलोड करा आणि परीक्षेची तयारी करा. Mahavitran Admit Card
महत्त्वाच्या सूचना:
- परीक्षेसाठी जाताना हॉल तिकीट घेऊन जावे कारण हॉल तिकीट शिवाय कोणत्याही उमेदवारास परीक्षा ग्रहात प्रवेश दिला जात नाही.
- परीक्षेला जाताना फोटो ओळखपत्र जसे की आधार कार्ड पॅन कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- परीक्षा पूर्वी हॉल तिकीट ची प्रिंट काढून घ्यावी.
- परीक्षेला जाण्यापूर्वी महावितरणाच्या यामागील प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा जेणेकरून तुम्हाला परीक्षा सोपे जाईल.
- सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी शुभेच्छा सर्वांनी शांत मनाने आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या.