MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची मेगा भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची सविस्तर माहिती

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागासाठी पशुधन विकास अधिकारी, गट-अ पदाच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 2795 पदाची मेगा भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल आणि नोकरी करण्यासाठी संधी शोधत असाल तर पशुधन विकास अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. हे पद पशुसंवर्धन क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. त्यामुळे जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरा. या भरतीसाठी आवश्यक तारखा कोणत्या पदाची भरती होणार आहे अर्ज कसा करावा? पात्रता या सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत.

महत्त्वाच्या तारखा:

  1. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
  2. परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

आरक्षणा नुसार पदाची संख्या:

या भरतीमध्ये एकूण 2795 पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे नियम आहेत. आरक्षणाचे तपशील पुढील प्रमाणे आहेत.

आरक्षित जातीपदांची संख्या
अनुसूचित जाती376
अनुसूचित जमाती196
विमुक्त जाती79
सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग68
भटक्या जमाती(ब)68 (क)93 (ड)63
इतर मागास वर्ग535
विशेष मागास वर्ग54
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक282

याव्यतिरिक्त महिला खेळाडू अनाथ आणि दिव्यांग यांच्यासाठी देखील स्पेशल आरक्षण ठेवण्यात आले आहे. MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

हे पण वाचा | वनरक्षक भरती 2025 : एकूण 12,991 जागा भरल्या जाणार; शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास Forest Guard Recruitment 2025

पात्रता:

  • या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे वसु वैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी असावी.
  • उमेदवाराचे वय एक ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे.
  • आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादा मध्ये काही प्रमाणामध्ये सवलत देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज क्लिक करा
जाहिरात क्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम MPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्या ठिकाणी या भरती संबंधातील सर्व माहिती सविस्तर अचूक भरवा आणि तुमचा फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया मुलाखत आणि चाचणी परीक्षा द्वारे केली जाणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नोकरी संबधातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करा

error: Content is protected !!