महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू, नोकरी करण्याची सुवर्णसंधी | MSRTC BHARTI 2025

MSRTC BHARTI 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सांगली विभागांमध्ये पद भरती निघालेली आहे. याची जाहिरात सकाळच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे. या पद भरतीसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. MSRTC BHARTI 2025

( नमस्कार मित्रांनो, कुठलेही भरती संदर्भात अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. जर भरती संदर्भात कुठली आर्थिक व अन्य फसवगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही अर्ज करताना संबंधित जाहिरात वाचा)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( MSRTC) सांगली विभागामार्फत समुपदेशक पदासाठी मानधन तत्वावर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावरती वेळेत अर्ज करायचा आहे.

पदांचा तपशील

  • पदांचे नाव : समुपदेशक
  • पदसंख्या : 1
  • मानधन : या पदासाठी पाच हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे.
  • नियुक्ती कालावधी : 1 वर्ष

शैक्षणिक पात्रता

  • या पदासाठी मानसशास्त्र किंवा सामाजिक कार्य पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • समपदेशनाच्या क्षेत्रातील शासकीय/ निमशासकीय/ मोठे खाजगी संस्थांमध्ये किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

कोणते काम करावे लागणार

  • या पदभरती निवड झाल्यानंतर महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन सेवा देणे, कर्मचारी, चालक, वाहक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी समुपदेशन शिबिरे घेणे.
  • मानसिक आरोग्याची संबंधित समस्यावर मार्गदर्शन करणे.
  • महामंडळाच्या नियमानुसार इतर आवश्यक जबाबदाऱ्या पार पडणे आवश्यक आहे.

काही महत्त्वाच्या अटी

  • व्यापार भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला मानधन तत्वावरती काम करावे लागणार आहे. नियुक्तीचे कालावधी एक वर्षाचा असेल त्यानंतर गरजेनुसार वाढविण्यात येणार आहे. सदर उमेदवारांना सरकारी सेवक कायमस्वरूपी सामील होण्याचा कोणताही हक्क असणार नाही. महिलांसाठी तीन तास सत्र अनिवार्य आहे.

निवड करण्याची पद्धत

  • या पद भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे निवड झालेली उमेदवारांनी एक वर्षासाठी नियुक्त केले जाईल त्यानंतर गरजेनुसार मुदत वाढ देण्यात येणार.

त्वरित अर्ज करा

  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल 2025 आहे अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे अनुभव प्रमाणपत्र आणि ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागाच्या कार्यालयामध्ये सादर करावा लागणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सांगली विभाग, कडगाव, शास्त्री चौक, सांगली कोल्हापूर रोड सांगली -416416

हे पण वाचा | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

1 thought on “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू, नोकरी करण्याची सुवर्णसंधी | MSRTC BHARTI 2025”

Comments are closed.

error: Content is protected !!